Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा सध्या अनेक बाबतीत प्रगती करू लागला आहे. जिल्ह्यात नुकत्याच तीन एमआयडीसीना मंजुरी मिळाली आहे.
आता अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक खुशखबर आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी येथे लोकर प्रक्रिया केंद्र निर्माण होणार आहे.

हे केंद्र स्थापन करण्यास कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक काल उपसचिव नि.भा. मराळे यांच्या सहीने जारी झाले आहे.
या प्रकल्पामुळे मेंढपाळांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे ३ लाख मेंढ्यांची संख्या आहे. पारनेरातील करंदी येथे गट नं १२२२ मधील ३ हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता या जागेवर ‘लोकर प्रक्रिया केंद्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाने या जागेवर लोकर प्रक्रिया केंद्रासाठी इमारत आराखडा, मशीनरी, मनुष्यबळ व फर्निचर या बाबींसाठी येणाऱ्या खर्चाचा सविस्तर तपशिलासह प्रकल्प अहवाल निधीच्या स्त्रोतासह प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्याचे निदेश दिले आहेत.
त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे. मेंढ्यांना लोकर ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. या लोकरमध्ये नैसर्गिक फायबर आहे.
थर्मल, रेग्युलेशन, फ्लेम रेझिस्टन्स, चांगले ध्वनीशास्त्र असे अद्वितीय गुणधर्म आहेत. लोकरचा वापर कपड्यांपासून बांधकाम उद्योगांपपर्यंत आणि तांत्रिक कापडाच्या अनेक क्षेत्रात केला जातो.
महाराष्ट्रात सुमारे ३० लाख संख्या असून मेंढ्यांपासून दरवर्षी अंदाजे ९८०० मेट्रिक टन लोकरीचे उत्पादन होते. लोकरपासून विविध उत्पादने विकसचित केली जाऊ शकतात तसेच या लोकरपासून योगा चटई आणि रजाई यासारखी मूल्यवर्धित वूल फेल्ड उत्पादने मिळू शकतात.
लोकर प्रक्रिया उद्योगांची निर्मिती केल्याने मेंढीपालन समुदायाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल.
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना