अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या ५ किमी अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली.
गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
अंकाई ते अंकाई किल्ला या ५ किमी मार्गावर चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ३५ किमी अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे. दुहेरी मार्ग व इलेक्ट्रिक लाईनमुळे नगर-मनमाड हा प्रवास सुपरफास्ट होणार असल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता.
तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत. आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक आणि दुहेरी करण्यात येत आहे. या कामामुळे रेल्वे ताशी ११० प्रति कि.मी. वेगाने धावणार असल्याने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनइर धर्मेंद्र कुमार, इंजिनइर सुद्धांसू कुमार, एक्झिकेटीव इंजिनइर वि. पी. पैठणकर यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली.