Ahmednagar Railway : अहमदनगरकरांसाठी गोड बातमी ! जिल्ह्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Railway

Ahmednagar Railway : नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या १३ कि.मी. अंतराची चाचणी शनिवारी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजिनचा वापर होत आहे.

गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

शनिवारी (दि. २२ जुलै) १३ कि.मी. द्रुतगती रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण ९४ कि.मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली. मनमाड़ ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग एकेरी असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच एकेरी मार्गामुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता.

तासन्तास रेल्वे गाडी एकाच जागी थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा संपूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजिनचा वापर करून द्रुतगती मार्ग करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १२५ प्रति कि.मी. वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे.

तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. शनिवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यंतंचा टप्पा पूर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागेल असा अंदाज आहे. यावेळी रेल्वे ताशी १२५ वेगाने धावली.

बेलापूर ते पढेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी.पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार, आर. डी. सिंग, इजिनिअर सुद्धांसू कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल आदींसह एक्झिकेटीव इंजिनिअर उपस्थित होते.

मनमाड ते नगर द्रुतगती रेल्वे मार्गाच्या सातव्या टप्प्याची चाचणी शनिवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढण्यात आला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल. – दीपक कुमार (उप मुख्य अभियंता, बांधकाम अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe