अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- अतिवृष्टीचा मोठा फटका नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याला बसला होता. यामुळे बळीराजा मोठया आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान येथील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाच्या दुसर्या टप्प्यात 11 कोटी 52 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/09/money.webp)
येत्या 8 ते 10 दिवसांत हे अनुदान संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. असल्याची माहिती तहसीलदार सी. एम. वाघ यांनी दिली. जिल्ह्यात सर्वात जास्त अनुदान शेवगाव तालुक्यास आले आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये शेवगाव तालुक्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्याने तालुक्यातील 9 गावांना पुराचा तडाखा बसला होता.
या नुकसानभरपाई पोटी पहिल्या टप्प्यात 16 कोटी 35 लाख 40 हजार रुपये अनुदान आले होते. 33 गावांतील 16 हजार 402 हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी 18 हजार 134 बाधित शेतकर्यांना 16 कोटी 35 लाख अनुदान वाटप करण्यात आले.
तालुक्यास जिल्ह्यात सर्वात जास्त अनुदान आले आहे मात्र अजूनही अनुदानाची रक्कम पुरेशी नसल्याने तालुक्यातील काही गावांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आजही तालुक्यातील अनेकांना नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही. शासनाने या नुकसानीचीही भरपाई द्यावी अशी मागणी पूरग्रस्त मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.