अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- विजेअभावी शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होऊ नये यासाठी सोलर प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीची दखल घेतली असून एप्रिल नंतर सोलर वाटप करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन उदय शेळके यांनी सांगीतले .

अहमदनगर येथे नगर तालुक्यातील सचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक यांची सोसायटी वसुली बाबत बैठक आयोजीत केली होती.
यावेळी ते बोलत होते. या वेळी शेळके म्हणाले, प्रत्येक सहकारी संस्थेने ठराव करून शंभर टक्के वसुली करायची आहे. कर्ज वसुली झाली तर शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देता येतो.
पतसंस्था प्रमाणे सेवा संस्थाना सोसायटींना एकरकमी कर्ज फेडण्याची योजना देण्याबाबत चर्चा चालू आहे. भुसार कर्जासाठी तीस हजार रुपये कर्जाची मर्यादा मागणी केली असल्याचे शेळके यांनी सांगीतले .
यावेळी माजी आ.कर्डिले म्हणाले नगर तालुक्यातील शेतकरी शासनाच्या शेतकी योजना पासून वंचित राहू नये यासाठी शंभर टक्के वसुली करणार.
कोरोना काळात बँकेने चारशे पन्नास कोटी रुपयाचे खावटी कर्ज वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागला. मागील वर्षी पुन्हा शेतकऱ्यांनी हे कर्ज नवे जुने करून घेतले.
या वर्षा शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज भरले तर पुन्हा खावटी कर्ज देणार. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयो माफ करणार असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
याबाबत उदय शेळके यांनी पवार यांच्याशी चर्चा करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा . विजेच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही.
रानटी प्राण्यांच्या भितीमुळे रात्री वीज असूनही पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सोलरसाठी कर्ज देण्याबाबत बँकेबरोबर चर्चा झाली त्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे