साईभक्तांसाठी आनंदाची बातमी ! साईबाबांचे मंदिर रात्रभर खुले राहणार

Published on -

Ahmednagar News : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०५ वा श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास काल मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्या फोटो व पोथीच्या मिरवणूकीने सुरुवात झाली.

मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई, “श्री राम मंदीर ” हा भव्य देखावा व हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त श्रीमती रेणुका चौधरी यांच्या देणगीतून करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले.

उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. आरतीनंतर पहाटे ०५.४५ वाजता श्री साईबाबांच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.

संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा आणि प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे व खरेदी विभागाचे प्र. अधिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, संरक्षण अधिकारी अणासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, पुजारी, कर्मचारी, साईभक्त आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाईत आल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला.

यावेळी संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी प्रथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी व्दितीय, प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे यांनी तृतीय, प्र. मुख्य रोखपाल विश्वनाथ बजाज यांनी चौथ्या व रुग्णालय विभागाचे उपवैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.

उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दिनांक २४ ऑक टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही, असे सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe