अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी येथील साईप्रसादालय उघडण्यासह शिर्डीकरांच्या विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दिंगबर कोते यांचे गेली सात दिवस आमरण उपोषण सुरु होते.
परंतु काल जिल्हा प्रशासनाने समन्वय साधत संस्थानचे साईप्रसादालय उघडण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.
शिर्डी शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते कोते दि.१८ नोव्हेंबरपासून शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्तांच्या विविध मागण्यांसाठी द्वारकामाई समोरच्या प्रांगणात उपोषण सुरू केले होते.
साईप्रसादालय,लाडू प्रसाद, प्रवेशद्वार क्रमांक तीन तसेच द्वारकामाई गेट, द्वारावती गार्डन, शहरातील रस्त्यावर लावलेले बँरीगेटस काढण्यात यावे आदी मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी कोते आमरण उपोषणाला बसले होते.
उपोषण दरम्यान कोते यांच्या द्वारावती गार्डन, आँफलाईन पासेस, बँरीगेटस या तीन मागण्या साईसंस्थानने मान्य केल्या होत्या.उर्वरित तीन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोते यांनी उपोषण सूरुच ठेवले होते.
उर्वरित मागण्यांपैकी प्रसादालय पन्नास टक्के आसनव्यवस्था ठेवून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँरीगेटस काढून टाकण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
द्वारकामाई मंदिराचे गेट उघडण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला असून अन्यथा पुन्हा उपोषण करण्यात येईल असे कोते यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम