शेवगाव तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पाण्याचे आवर्तन सुटले

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सुटले असून, या आवर्तनामुळे शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंप्री, पिंगेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी, या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पैठण जायकवाडी धरण हे शेवगाव तालुक्यातील अनेक गावे विस्थापित होऊन तयार झालेले धरण असून, या धरणातून दोन कालवे तयार करण्यात आलेले आहेत. एक डावा कालवा पैठण पासून नांदेडपर्यंत गेला असून,

सध्या खरीप पिकांचा हंगाम सुरू असून, तालुक्यात सुरुवातीपासून मोठा पाऊस जरी झाला नसला तरी थोड्या फार पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. त्यानंतर सलाईन प्रमाणे पडलेल्या पावसामुळे पिकांची अंतर्गत मशागती होऊन पिक जोमाने आली असताना आतापावसाभावी ते वाया जाणार, या चिंतेत शेतकरी होते.

मात्र पैठण उजवा कालव्यातून खरीप संरक्षणात्मक पाण्याचे एक आवर्तन सुटल्याने शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंप्री, मुंगी, हातगाव व कांबीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे.

मात्र, कालव्यात पाणी आले की शेतीपंपाचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याच नेहमीचा अनुभव असल्याने कालव्यात पाणी येऊनसुद्धा उपयोग होणार की नाही, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe