Shrigonda News : इंस्टाग्रामवर झाली ओळख, स्वस्तात सोने देतो बोलला आणि केल असे काही…

Ahmednagarlive24 office
Published:
Shrigonda News

Shrigonda News : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा उपयोग करत हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला व त्याच्या आईला स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने देऊन ड्रॉप टाकत फसवणूक केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव परिसरात दि.३ ऑगस्ट रोजी घडली

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दीपक कोंडीबा वाघमारे (वय २२, रा. कुरुंदा, ता.वसमत जि. हिंगोली) या तरुणाच्या फिर्यादीवरून अविनाश भोसले (रा. गुंडाचीवाडी, कुळधरण ता. कर्जत) आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुरुंदा येथील दीपक वाघमारे या तरुणाची इंस्टाग्रामवरून कर्जत येथील अविनाश भोसले या इसमाशी ओळख झाली होती.

दि. ५ जुलै रोजी अविनाश भोसले याने दीपक वाघमारे याच्या फोनवर फोन करून दोघांनी एकमेकांची ओळख काढत संपर्क करू लागले असताना त्यांच्यामध्ये मैत्री झाली. वारंवार होणाऱ्या संभाषणातून एकमेकांवर विश्वास बसला.

एक दिवस अविनाश याने फोन करून त्याच्याकडे कमी दरामध्ये सोने मिळत असल्याचे सांगत तुला पाहिजे असेल तर सांग असे तो म्हणाला. दीपक याने घरच्यांशी विचारविनिमय करत दोन लाख रुपयांचे सोने खरेदी करण्याची तयारी दाखविली.

त्यानुसार वाघमारे आणि त्याची आई ३ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव याठिकाणी आले असता तेथील परिसरातील एका झाडाखाली दोन इसम व एक महिला उभे होते.

तेथे दोघांना बोलावून घेत अविनाश भोसले आणि उर्वरित दोघांनी दोन लाख रुपये घेऊन रुमालामध्ये बांधुन आणलेल्या सोन्याच्या चैन दाखवत त्याचे वजन १६ तोळे असल्याचे सांगितले.

हे दागीने घेऊन वाघमारे यांनी सोनाराकडे जाऊन चौकशी केली असता त्या सोन्याच्या चैन बनावट असल्याचे समजल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe