शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह कार्यालय परिसरात मनाई आदेश जारी

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दि. 16 मार्च ते 13 मे, 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उप विभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये तसेच शासकीय विश्रामगृह येथे कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे एक आदेशाद्वारे कळविले आहे.