अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आल्यापासून एकही ठोस स्वरुपाचे काम दिसून येत नाही. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे.
तर दुसरीकडे ज्या कामाचे उद्घाटन हे सरकार करत आहे, ते भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेले आहे. अशी टीका माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ. विखे आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले राज्यात आघाडी सरकारने एकही काम केले नाही.
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, बंधारे तुटली, शेतीचे नुकसान झाले, विजेचे पोल वाकले. मात्र या सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. डिपी जळाली तर जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत डीपी चालू केली जात नाही.
तसेच या सरकारच्या काळात सिंगल फेज बंद करण्याचे काम करण्यात आल्याची टीका कर्डिले यांनी केली. तसेच कर्डीले म्हणाले खासदार डॉ. सुजय विखे यांच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो,
तर त्याच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावू. भाजप सरकार असताना आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री राम शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी पूर्णतः मतदारसंघात लक्ष देऊन मतदार संघाचा विकास केला.
मात्र, सध्याचे पालकमंत्री शोधून सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता कर्डिले यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम