माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’ !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर, पाथर्डी, राहुरी तालुका बुथ नियोजनात मागे राहिला. त्यामुळे वरिष्ठ आपली दखल घेत नाहीत. आपले काम जोरात असते तर वरिष्ठांनी दखल घेऊन आमदार राम शिंदे यांच्या प्रमाणे माझी ही वर्णी विधानपरिषदेवर लागली असती,

अशी मिश्किल टिपण्णी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. तालुक्‍यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियाना संदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे एकजूट दाखविल्यास आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना भुईसपाट करण्यात येईल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव अटळ आहे.

विरोधकांना महत्त्व न देता आपले कार्य सुरू ठेवायचे आहे. मी व्हाट्सअप, फ़ेसबुक वापरत नाही. त्यामध्ये गुरफटून न जाता मला लोकांना प्राधान्य देऊन लोकांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत.

राहुरी बाजार समितीत झालेल्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. आगामी निवडणुकांसाठी राहुरी, पाथर्डी तालुक्‍यात वेळ देणार आहे. आता नगर तालुक्‍यातील जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले,

कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’

कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर मतदार संघात ‘गुजरात पॅटर्न’ राबवावा लागेल. गुजरात मध्ये बूथ सशक्तिकरण झाल्याने सहाव्यांदा तेथे भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे कर्डिले यांना आमदार करायचे असेल तर गुजरात प्रमाणे आपल्याकडे बूथ सशक्तीकरण अभियान सक्रियपणे राबविण्याची गरज असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी सांगितले.

गाडे, हराळ यांनी निवडणूक लढवणे गरजेचे होते

बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्‍यात विरोधकांचे पानिपत झाले आहे. पण त्यातून दोघेजण सुटले. शशिकांत गाडे व बाळासाहेब हराळ यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायलाच हवे होते. त्यावेळी त्यांना समजले असते, असा टोलाही कर्डिले यांनी लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe