अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- गुन्हेगारीमध्ये नेमीचं अव्वल असलेले उत्तरप्रदेश, बिहार नंतर नगर जिल्ह्याचा नंबर लागतो कि काय ? अशीच परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दिसून येऊ लागली आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून असाच काहीसा प्रकार नगर शहरात नुकताच घडला आहे. व्याजाच्या रकमेसाठी मारहाण व डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विशाल संदीप वालकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार बुर्हाणनगर येथील देविदास बाबासाहेब कर्डिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वालकर यांनी कर्डिलेकडून 19 लाख 49 हजार 900 रूपये व्याजाने घेतले होते.
त्याची व्याज रक्कम कर्डिले यास दिली होती. त्यानंतरही आरोपीने सहकार सभागृह जवळील दुकानात बोलावून घेऊन ज्यादा रकमेची मागणी करत जबर मारहाण केली.
वालकर यांच्याकडे असलेली कागदपत्रांची बॅग हिसकावून घेत दुकानातील रिवाल्वर काढून डोक्यास लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कर्डिलेसह अन्य चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम