Ahmednagar News : दिड एकर ऊस आगीत खाक ! अग्निशामक पथकामुळे वाचला चार एकर ऊस

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता शहरातील १५ चारी परिसरातील अशोक दौलत बोठे या शेतकऱ्याच्या शेतातील उसाला आग लागून सुमारे दिड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशामक पथक आल्याने उर्वरित चार एकर ऊस वाचला.

राहाता येथील १५ चारी परिसरातील सर्व्हे नंबर ९५६ मधील बोठे यांचा दीड एकर ऊसाला शनिवारी दुपारी विद्युत वाहक तारांमुळे आग लागली. आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. त्यात ऊस जळून खाक झाला,

जर राहाता नगरपालिकेचे अग्निशमन पथक वेळीच घटनास्थळी पोहचले नसते, तर शेतातील उर्वरित संपूर्ण ऊस जळून खाक झाला असता. या आगीच्या घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ऊसाला आग लागल्याचे समजतात ऊस मालक अशोक बोठे यांनी सदरची घटना तात्काळ सामाजिक कार्यकर्ते राहुल सदाफळ व राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक कक्षाला कळवली.

त्यानंतर त्यांनी तातडीने राहाता नगरपालिका प्रशासन तसेच अग्निशामन विभाग प्रमुख अशोक साठे यांच्याशी संपर्क साधून आग लागल्याचे सांगितले. राहाता नगरपालिकेचे अग्निशामक पथकातील चालक प्रमोद बनकर व फायरमन गोरक्ष साळवे यांनी स्थानिकांची मदत घेऊन तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले व वेळेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे उर्वरित संपूर्ण चारपाच एकर ऊस आगीपासून वाचला.

राहाता परीसरात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या तारा लोबलेल्या व झोळ पडलेल्या आहेत. त्यामुळे अनेकदा स्पार्किंग होऊन उसाला आग लागण्याच्या घटना घडताहेत. पिके जळून खाक होतात.

यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते; परंतु शेतकऱ्यांना कुठलीही भरपाई मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडतो, अशा घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत विशेष सर्व्हे करून ज्या ठिकाणी वीज वाहक तारा धोकादायक स्थितीत असतील, तेथे उपाययोजना राबवून आगीच्या घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe