Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्हा रुग्णालयातील विदारक स्थिती समोर येत आहे. नांदेड व छत्रपती संभाजी नगर मधील मृतांच्या तांडवानंतर अनेक ठिकाणची माहिती समोर येऊ लागली. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात एका प्रसिद्ध दैनिकाने अचानक रात्री पाहणी केली. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती आहे, परंतु, रात्रीच्यावेळी शिकाऊ डॉक्टरांवरच काम भागविले जाते. नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यापासून ते वॉर्डातील रुग्णांवर उपचार करणे, ही सर्व कामे शिकाऊ डॉक्टर करत असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळची स्थिती अशी होती की, प्रवेशद्वाराच्या बाजूस असणारा महिलांचा नावनोंदणी कक्ष बंद होता. पुरुषांचाच कक्ष सुरु असून तेथे महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. जरा गोंधळाचीच स्थिती होती.
उजव्या बाजूस ओपीडी आहे. त्याठिकाणी डॉक्टर व पाच ते सहा शिकाऊ डॉक्टर दिसून आले. रुग्णांकडे केलेल्या चौकशीअंती मुख्य डॉक्टरांचा राउंड झाला नसल्याचे समजले. तर काहींनी रात्री डॉक्टरांचा राउंड होतच नाही गरज पडल्यास त्यांना बोलवले जाते असे सांगितले. डॉक्टरांच्या दालनात डॉक्टर नव्हते. केवळ ओपीडीमध्ये प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
* रुग्णालयात बेड कमी रुग्ण जास्त
जिल्हा रुग्णालयात २८२ खाटा आहेत. परंतु ३२२ पेशंट सध्या ऍडमिट आहेत. तसेच ऑक्सिजन बेड व आयसीयू बेड देखील फुल असल्याने ते देखील शिल्लक नसल्याचे समजले आहे
* आग लागून मृत्यूकांड देखील घडले होते
सन २०२१ मध्ये जिल्हा रुग्णालयातील नवीन अतिदक्षता विभागाला आग लागण्याची घटना घडली होती. त्यावेळी या विभागाचे फायर ऑडिट झालेले नव्हते अशी माहिती मिळाली होती. या आगीच्या घटनेत अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता.
* रात्रीस शिकाऊ डॉक्टर
जिल्हा रुग्णालयात रात्री शिकाऊ डॉक्टरांच्या हातात मदार असलेली दिसत आहे. कारण तज्ञ डॉक्टर रात्रीच्या वेळी नसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णांची जबादारी शिकाऊ डॉक्टरांकडे असते. दरम्यान रात्रीच्या वेळी शिकाऊ डॉक्टरांची नेमणूक नसते.
सात वार्ड व सीएमओ व डीएमओ असे नऊ डॉक्टरांची नेमणूक असते. वार्डाची जबाबदारी असलेल्या डॉक्टरांना वेळ पडल्यास बोलवले जाते व ते तात्काळ हजारही होतात असे जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी संगितले आहे.