Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’- आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : विरोधकांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत मालदाड गावाच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. विकासकामांना आडवे न जाता गावच्या विकासात साथ दिली पाहिजे. गावाच्या विकासासाठी एकोपा असणे गरजेचे असते.

निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’ राबविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे आयोजित कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनाथ नवले होते. यावेळी राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि. बी.आर. चकोर, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे,

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, दूध संघाच्या संचालिका मंदाताई नवले, इंजि. विपुल नवले, गोरख नवले, विलास कवडे, भारत वर्षे, सखाराम शेरमाळे, विलास नवले, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सरपंच गोरख नवले, उपसरपंच गणेश भालेराव यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, गावाच्या विकासासाठी एकोप्याचे वातावरण असणे गरजेचे असते. मालदाड गावात आपल्या माध्यमातून विकासकामे झालेली आहेत. गावातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय कार्यक्षम आहे. गावासाठी लागणारा मालदाड गाव ते नाशिक महामार्ग रस्ता मंजूर केला होता.

मात्र, या सरकारने स्थगिती दिली. तरी आपण तो विषय विधानसभेपर्यंत नेऊन पाठपुरावा करून रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. याप्रसंगी विलास नवले, गोरक्षनाथ नवले, इंजि. बी. आर. चकोर, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची भाषणे झाली. प्रारंभी सरपंच गोरक्ष नवले यांनी प्रास्ताविक केले. विपुल नवले यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य शिवाजी नवले यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe