दुर्गंधीयुक्त पाण्याला ‘तो’ कंटाळला अन अंगावर पेट्रोल ओतून घेत केले ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- राहाता शहरालगत चितळी रोड निकाळे वस्ती येथे सात ते आठ कुटुंब राहतात. झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या घरात पाणी गेल्याने काही दिवस सदर कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले.

सध्या पाऊस उघडल्यावर सर्व कुटुंब पुन्हा तेथे राहायला आले. मात्र पाणी कमी झालेच नाही. सदर पाणी दुर्गंधीयुक्त काळे झाले. यामुळे रोगराई वाढू लागली.

वारंवार सांगूनही राहाता पालिकेने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या तरुणाने राहाता नगरपालिकेच्या निषेधार्थ पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले.

परंतु पालिका कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानतेमुळे अनर्थ टळला. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.

अक्षय कैलास निकाळे (वय 24) याने बुधवारी संध्याकाळी पालिकेत जाऊन स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यावेळी ड्युटीवर असलेले कर्मचारी बनकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने संबंधितास तातडीने पालिकेच्या बाहेर येऊन पाणी टाकले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe