त्यांनी पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडली माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पवार घराण्याचा वारसा सांगता, लढवून दाखवा निवडणूक दोन दिवसांवर आली असताना विरोधी उमेदवार फोडता लाज वाटली पाहिजे, त्यांनी केवळ पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडन्याचे काम केले आहे.(ram shinde) 

अशी टीका माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रचारा सांगता सभेचे आयोजन बाजारतळ येथे करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, गोरगरीब जनतेच्या घराला हात लावून दाखवा, जीवाची बाजी लावील असे थेट आव्हान दिले.

आता लोक आपले उतारे उशाला घेऊन झोपतात, त्यामुळे आता आलेले संकट परतवून लावण्यासाठी २१ तारखेला उतारा टाका असे आवाहन येथील नागरिकांना केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News