अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून सुधाकर लोंढे यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. लोंढे हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राहुरी तालूक्यातील कानडगाव येथील तोरणा हाँटेल समोर उभे असताना ही घटना घडली.
सुधाकर काशिनाथ लोंढे वय ४६ वर्षे राहणार कानडगाव ता. राहुरी. हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजे दरम्यान त्यांच्या मित्रांबरोबर कानडगाव येथील हाँटेल तोरणा समोर उभे होते.
त्यावेळी तेथे आरोपी सागर पोंदे राहणार कानडगाव हा तेथे आला. त्यावेळी फिर्यादी सुधाकर लोंढे यांनी त्याला दिलेले उसने पैसे मागीतले. त्या कारणावरुन त्याने सुधाकर लोंढे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आणि त्यांच्या हाताचे बोटाला चावा घेतला. तसेच तु जर परत मला उसने दिलेले पैसे मागीतले, तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.
सुधाकर काशिनाथ लोंढे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर कैलास पोंदे राहणार कानडगाव ता. राहुरी. याच्या विरोधात मारहाणीचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम