अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- आ. रोहित पवार यांना कोरोनातून लवकर बरे कर, असे साकडे घालत कर्जतचे बळीराम धांडे यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला साकडे घालत नवस बोलले होते.
आ. रोहित पवार यांनी तुळजापूरला भेट देऊन आई तुळजाभवानी पुढे नतमस्तक होत धांडे यांचा नवस फेडला. आ. रोहित पवार यांना कोरोना झाला असताना गावागावांत अनेक ठिकाणी आरत्या झाल्या.
कर्जत येथील बळीराम धांडे यांनी मात्र थेट तुळजापुरात जाऊन तुळजाभवानीच्या मंदिराला पाच फेऱ्या साष्टांग दंडवत घालून नवस बोलले की,
आ. रोहित पवार लवकर बरे झाले की मी सोन्याची नथ, एक पैठणी शालू, ५५५५ गुलाबांच्या फुलांचा हार, अर्पण करील. याबाबत आ. पवार यांना माहिती समजताच त्यांनी तुळजापूरला जाऊन दर्शन घेण्याचे व नवस फेडण्याचा शब्द दिला.
त्याप्रमाणे नुकतेच आ. रोहित पवार यांनी तुळजापूरचा दौरा केला, यासाठी बळीराम धांडे यांनी खास शिर्डीवरून पाच हजार गुलाबाच्या फुलांचा हार बनवून आणला
व आ. रोहित पवार यांच्या हस्ते हस्ते आई तुळजाभवानी मंदिराच्या बाहेर या हाराचे पूजन करून मंदिराच्या मुख्य राजे शहाजी महाद्वारास बांधण्यात आला. तसेच मंदिरात जाऊन सोन्याची नथ व पैठणी शालू देवीला अर्पण केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम