हृदयद्रावक ! आईला सोडून घराकडे निघालेल्या 18 वर्षीय तरुणासोबत घडलं भयानक; मातेला निरोप देऊन निघालेला महेश पुन्हा परतलाच नाही

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Accident News

Ahmednagar Accident News : गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, अहमदनगरमधून एक भयानक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,

मराठवाड्यातील बीडच्या आष्टी तालुक्याच्या टाकळी अमिया या गावात संत बाळूमामांच्या मेंढ्या आलेल्या आहेत. यामुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या परिसरातील बाळूमामाचे भक्त या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने गर्दी करत आहेत.

दरम्यान याच कार्यक्रमासाठी कडा परिसरातील एक तरुण आपल्या आईला घेऊन गेला असता परतीच्या प्रवासात त्याचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना अहमदनगर-बीड महामार्गावर असलेल्या कडा परिसरात घडली आहे. या अपघात 18 वर्षीय तरुणाचा दुर्देवी अंत झाला आहे.

यामुळे कडा परिसरात शोककळा पसरली आहे. महेश नागेश होळकर अस तरुणाच नाव आहे. महेश आपल्या आईला कार्यक्रमास्थळी सोडून रात्री घराकडे परतत होता. यावेळी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक मारली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे कडा गाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात आपला लेक वारला अशी बातमी आईला समजतात आईच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आईला ही शोकाची बातमी समजताच तिने टाहो फोडला आहे. या मातेने आपल्या सुखाच्या संसारात असं विघ्न पडेल याची साधी कल्पना देखील केली नव्हती.

दरम्यान अवघ्या 18 वर्षे तरुणाचा असा करून अंत झाला असल्याने गाव शिवारात या अपघाताच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांसाठीच हा चिंतेचा विषय बनला आहे.

अहमदनगरमध्ये घडलेली ही घटना खूपच दुर्दैवी असून या मातेच्या पोटचा गोळा असा हरपून गेल्याने होळकर कुटुंबावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे होळकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडला आहे. धार्मिक कार्यक्रमात आपल्या आईला सोडून परतत असतांना झालेला या अपघातामुळे कडा गावात व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe