उष्णतेचा कहर, अहमदनगरमध्ये तापमानाचा उच्चांक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मुंबईसह लगतच्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना अहमदनगरमध्येही शुक्रवारी या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मार्च महिन्यातच पारा चाळीशी ओलांडल्याचे प्रकार गेल्या २२ वर्षांत यापूर्वी दोनदा घडलेले आहेत.

२००० मध्ये ३० मार्चला अहमदनगरमध्ये पारा ४३.२ अंशावर गेला होता. तर त्यानंतर २०१९ मध्ये ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

यावर्षी पुन्हा एकदा मार्चमध्ये पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. धुलीवंदनाच्या दिवशीच उष्णतेचा कहर झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी आहे. बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe