उन्हाचा तडाखा ; ‘या’ तालुक्यातील काही भागात पाणीबाणी : विहिरींनी गाठला तळ,पिके धोक्यात

Published on -

Ahilyanagar News : मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे.जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांत पाणीबाणी सुरू झाली असून विहिरींची पाण्याची पातळी खालवली आहे.विहिरींनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीलाच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे.

गतवर्षी पावसाळ्यात जरी जेमतेम पाऊस झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअर व विहिरी खोदल्या असून तेवढ्याच प्रमाणात अनेक ठिकाणी विहिरीवर व बोअरवर सौर ऊर्जाचे विद्युत पंप बसवण्यात आल्याने या सौर पंपाद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे.

पाण्याचा उपसा वाढल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जाऊन त्याचा आजच परिणाम जाणऊ लागला असल्याचे दिसून येत आहे. कधी नव्हे एवढ्या विहीर व बोरची संख्या वाढल्याने व त्यावर पाणी उपशाचे सौरउर्जेचे साधन उपलब्ध झाल्यामुळे चालूवर्षी अनेक विहिरींनी सध्याच तळ गाठले आहेत.

या अगोदरची परिस्थिती लक्षात घेतली तर विहीर व बोअरची संख्या कमी व त्यामधून विजेवर चालणाऱ्या विद्युत पंपाचे पाणी उपशाचे जे साधन होते, त्यासाठी मिळणारी वीज़ ठराविक वेळीच मिळत असल्याने विहीर व बोअरमधून कमी होत असे.त्यामुळे जमिनीमध्ये पाणी टिकून राहून किमान एप्रिलच्या पंधरवाड्यापर्यंत विहिरींना पाणी टिकत असे.

मात्र, आज परस्थिती बदलल्याने फेब्रुवारी अखेरलाच विहीर व बोअरने तळ गाठल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजच प्रशासनाला तजवीजमध्ये राहावे लागेल, अशी शक्यता दिसून येत आहे. पैठण उजव्या कालव्यात सुटणाऱ्या आवर्तनमुळे खडके, मडके, खामपिंपरी नवीन व जुनी, प्रभुवाडगाव, लखमापुरी, सोनविहीर, पिंगेवाडी, हातगाव, कांबी, बोधेगाव व बालमटाकळी, या गावांना काही प्रमाणात सुटलेल्या आवर्तनचा फायदा होत असून, यातील अनेक गावे निव्वळ आवर्तनावर अवलंबून आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe