Rain In Bhandardara : भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली

Published on -

Rain In Bhandardara : भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस कोसळत असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड पडत असलेल्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भातशेती पाण्याखाली गेली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा तसेच पाणलोटामध्ये गुरुवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांची नुकतीच लागवड झालेली खाचरे पाण्याखाली बुडाली आहेत. अनेक ठिकाणी ओढ्या- नाल्यांनी रुद्रावतार धारण केल्याचे दिसुन येत आहे. कळसुबाई शिखरावरही मुसळधार पाऊस पडत असल्याने कृष्णावती नदीही दुथडी भरून चाहत आहे. भंडारदरा धरणातून शुक्रवारी ११ हजार क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने रंधा धबधबाही पूर्ण क्षमतेने कोसळत आहे.

पर्यटकांनी हा धबधबा बघण्यासाठी एकच गर्दी केली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या च्या सांडव्यातून ११ हजार २८४ क्युसेक तर वीजनिर्माण केंद्रातुन ९३५ क्युसेक असा एकूण १२ हजार ११९ क्युसेक प्रवरा नदीमध्ये सुरु करण्यात आला होता. घाटघर व रतनवाडीला पावसाने: अक्षरशः झोडपुन काढले.

घाटघर येथे २५६ मीमी तर रतनवाडी येथे २४५ मीमी पावसाची नोंद झाली असून या पावसाळ्यातील ही विक्रमी नोंद आहे. दिवसभर आदिवासी बांधवांना आपली जनावरे पावसाच्या कारणास्तव घरातच बांधून ठेवावी लागली. गेल्या २४ तासात भंडारदरा परिसरात तुफान मुसळधार पाऊस कोसळल्याने भंडारदरा येथे १६५ मीमी पावसाची नोंद झाली आहे, तर घाटघर येथे १० इंच म्हणजे २५६ मीमी तर रतनवाडीलाही २४५ मीमी पाऊस पडला.

पांजरे येथे १९९ मीमी तर बाकी येथे १२९ मीमी पाऊस पडला. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९ हजार २७५ दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा धरण ८४ टक्के भरले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी भंडारदरा धरणातून विसर्ग कमी करण्यात आला असून सांडव्यामधून ९ हजार ९७२ व वीजनिर्माण केंद्रातून ८३५ असा ९ हजार ९०७ क्युसेक विसर्ग करण्यात आला असल्या भंडारदरा धरणशाखेचे प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. भंडारदरा धरणामधुन पाणी विसर्जित होत असल्याने निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असुन धरण ६५ टक्के भरले आहे. धरणाचा पाणीसाठा ५ हजार ३९८ दशलक्ष घनफूट झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News