अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरुवात होण्याची सुरुवात झाली होती तोच शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. यातच ऐन लक्ष्मी पूजनाच्या वेळीच सुपा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
यामुळं खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची काही काळ चांगलीच धावपळ झालेली पाहायला मिळाली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लक्ष्मीपुजनाची वेळ जवळ आलेली आसताना पुजेचे साहित्य महालक्ष्मी,
फळे, फुले सह इतर साहित्य खरेदी करण्यात नागरिक व्यस्त असताना जोरदार विजाच्या कडकडाटासह वादळी वारा सुटला व काही कळायच्या आत जोरदार वाऱ्यासह पावसास सुरवात झाली.
यावेळी बाजारपेठे मोठी गर्दी झाली होती. आचानक जोरदार पावसास सुरवात झाल्याने रस्तावरील विक्रेते फटाका स्टाँल याची खुपच धावपळ झाली तर खरेदीसाठी आलेल्या नागरिकाचीही चांगली ताराबळ उडाली.
यात फटाके विक्रेते याचे चांगल्या प्रकारे नुकसान झाले. ऐन लक्ष्मी पुजनाच्या वेळेला लक्ष्मीच्या पावलांनी पावसाचे आगमन झाले हा पाऊल सध्या कांदा ज्वारी आदी पिकासाठी चांगला फलदायी आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम