Ahmednagar Rain : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात सीना नदीला पुर आला होता.
दरम्यान या पावसाचे पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत.
पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला महापूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले.नदिच्या पुराचे पाणी महामार्गावरील पुलावरुन गेल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळीत टाकला नव्हता त्याचेही नुकसान झाले आहे.