Ahmednagar news : जूनमध्ये पाऊस आल्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्याला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पेरण्या झाल्या आहे. कापसाची सर्वाधिक सरासरीच्या ८० टक्के पेरणी झाली असून, एक लाख हेक्टरचा कापूस लागवडीने टप्पा गाठला आहे. महिनाअखेर पेरण्या सरासरी ओलांडतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
यंदा पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे जूनमध्येच बहुतांश भागात कापसाच्या लागवडीकरण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यात सुमारे २७ लाख ९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

मात्र आता या चांगली उगवण झालेल्या कापसाच्या पिकांवर काही वाईट प्रवृत्तीची नगर पडली आहे. नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे कपाशी पिकावर आज्ञात समाजकंटकाने तणनाशक फवारणी केली असून त्यामुळे येथील दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे बाबासाहेब रामभाऊ भोगे व सखाराम रामभाऊ भोगे या शेतकऱ्यांच्या गट नं ८००/२ मधील या कपासी लागवड केली होती. सध्या हे पीक जोमात आलेले होते. मात्र हे जोमात आलेले पीक कोणाला तरी रुचले नाही व या मोठ्या कष्टाने लागवड केलेल्या पिकात आज्ञात इसमाने तणनाशकाची फवारणी करून पीक जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
या पिकाची या शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी लागवड केली होती. आज्ञाताने तननाशक फवारणी केल्यामुळे पीक वाया गेले आहे. या दोन शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असुन भोगे यांनी कषी विभागाकडे तक्रार केली आहे.
एकीकडे वाढत असलेले खाते बियाणे यांचे भाव त्यामुळे आधीच पेरणी करण्यासाठी शेतकरण्या मोठं खर्च येतो, मात्र हा खर्च करून पीक मोठे झाल्यानंतर असे प्रकार झाल्याने शेतकऱ्यांना आता पिकांचे राखण करावे की इतर कामे करावीत असा प्रश्न पडला आहे.













