येथे संगणकावर खेळला जातो जुगार; पोलिसांचा छापा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- संगणकावर खेळल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. नालेगावातील नेप्तीनाका येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 25 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी प्रथमेश प्रमोद भाकरे (वय 21) याच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक दीपक रोहकले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, संतोष गोमसाळे, अमोल गाडे, रोहकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe