अरे अरे …मासेमारी करायला गेला परंतु स्वतःचा जीव गमावून बसला..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालुक्यातील पिंपळगाव येथे मासेमारी करण्यासाठी तलावात उतरलेल्या एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मच्छिंद्र कचरू बर्डेअसे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव तलावाच्या कडेला आदिवासी भिल्ल समाजाची मोठी वस्ती आहे. येथील आदिवासी समाज पिंपळगाव तलावात मासेमारी करत आपली उपजीविका भागवत आहे.

मच्छिंद्र कचरू बर्डे (वय ४६) हा तरुण मासेमारी करण्यासाठी तलावात उतरताच येथे सुरू असलेल्या विद्युत पंपात करंट उतरल्याने मच्छिंद्र बर्डे याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर विद्युत कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करून देखील विद्युत पुरवठा बंद करण्यात येत नव्हता.

एमआयडीसी पोलीस स्टेशन घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी विद्युत् पुरवठा बंद करण्या साठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार विनवणी करण्यात येत होत्या. तर तेथे नियुक्तीस असलेल्या वायरमन यांनी मोबाईल बंद करून ठेवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe