अहमदनगर शहरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस ! मुंबईहून आणल्या मुली आणि..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरातील नवनागापुर येथील चेतना कॉलनीत एका घरात सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. या कारवाईत मुंबईहून आणलेल्या दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली असून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना बुधवारी (दि.४) गोपनीय माहिती मिळाली की, चेतना कॉलनी, नवनागापुर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे.

ही माहिती मिळताच त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सानप यांनी एक पथक तयार करून सदर ठिकाणी बनावट ग्राहकपाठवून पंचासमक्ष छापा टाकला.

तेथे मुंबईहून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्या मुलींची सुटका करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेवुन तिच्या विरुदध भा. दं.वि. कलम ३७० सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम ३, ४, ५, ६, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. नितीन उगलमुगले, पो. ना. विष्णु भागवत, पो.ना. राजु सुद्रीक, पो.कॉ. किशोर जाधव, उमेश शेरकर, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, महिला पो.ना. मनिषा काळे, सोनाली जाधव यांचे पथकाने केली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe