चायना मांजामुळे तरुण जखमी ; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील चोरी छुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरूच आहे. दरम्यान पोलीस पथकासह वनविभागाच्या पथकाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.

मात्र बंदी असलेल्या या घातक मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मकर संक्रांतच्या पूर्वसंध्येलाच नगरमध्ये एका युवकचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेल्याचा प्रकार घडला.

धीरसिंग कल्याणसिंग (वय १९, सध्या रा. विनायकनगर) या युवकाचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला गेला आहे. सावेडीतील बालिकाश्रम रोडवर आज सायंकाळी ही घटना घडली.

धीरसिंग हा दुचाकीवर होता. त्यावेळी त्याच्या गळ्याभोवती नायलॉन मांजा गुंडाळला गेला. दुचाकीच्या वेग आणि गळ्याभोवती गुंडाळलेल्या गेलेल्या मांजामुळे वीरेंद्र याला मोठी जखम झाली.

तो चालत्या दुचाकीवरून खाली कोसळला. जखमी झालेल्या धीरसिंग याला सावेडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मांजामुळे मानेवर खोलवर जखम झाली असून,

घशातील स्वरयंत्रणापर्यंत जखम झाली आहे. धीरसिंग याला बोलता येत नाही. त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. पुढील काही तास चिंतेचे असल्याचे धीरसिंग याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment