वीजबिल माफीसाठी त्यांचे अर्धनग्न आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना महामारी संकटाच्या काळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. यामुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, मजूर यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले.

दरम्यान कोरोनाचे हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतया सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन केले.

यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत,

यशवंत जेठे, वक्ते प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.