राज्यात लसीकरणात हिवरे बाजार अग्रस्थानी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच सध्या लसीकरण मोहीम तीव्रतेने सुरु करण्यात आले आहे.

नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार गावातील फक्त 59 नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. अन्यथा हिवरे बाजारमध्ये 100 टक्के लसीकरण झाले आहे.

गेल्या दोन वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत अद्याप लसीकरण झालेले नाही.

मात्र नगर तालुक्यातील आदर्श गाव असलेले हिवरे बाजारमध्ये 59 नागरिक वगळता सर्वांचे लसीकरण झाले आहे. हिवरे बाजार इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले राज्यातील पहिलेच गाव ठरले आहे.

आदर्श गाव हिवरे बाजारमधील 60 वर्षावरील 182 नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. त्यातील 145 नागरिकांनी लसीचा पहिला व दुसरा डोस पूर्ण केला आहे.

60 वर्षावरील 37 नागरिकांनी लसीकरण केलेले नाही. 45 ते 59 वयोगटातील 264 नागरिकांचे लसीकरण अपेक्षित असताना त्यातील 255 नागरिकांनी पहिला तर 141 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे.

सध्या स्थितीत गावातील फक्त 59 जण लसीकरणापासून वंचित आहेत मात्र त्यांचेही लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe