अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच झालेल्या एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू गौरव डहाळे, अक्षय मुल्लया व सिद्धार्थ नागोरी यांचा टीम टॉपर्स स्पोर्टस अॅण्ड मल्टीपर्पज अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
टीम टॉपर्सचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांनी एलएलबी उत्तीर्णांचा सत्कार केला. यावेळी टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड,
नेटके ड्रॉइंग अकॅडमीचे संस्थापक प्रवीण नेटके, सुनील डहाळे, किरण माने, पुरुषोत्तम कदम, योगेश गायकवाड, कृष्णा अल्हाट आदी उपस्थित होते.
गौरव डहाळे हा टीम टॉपरचा खेळाडू असून त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
तसेच त्याने गिनीज बुक, लिम्का बुक, आशिया बुक, इंडिया बुक अशा विविध रेकॉर्ड बुकमध्ये स्केटिंगचा विश्वविक्रम केला आहे. तसेच तो सुवर्ण लक्ष क्रीडा पुरस्कार व वर्ल्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांचाही तो मानकरी ठरलेला असून,
त्याने एलएलबी उत्तीर्ण केल्याबद्दल टीम टॉपर्सच्या वतीने त्याला व इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved