Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यात अकोला ग्रामपंचायत अंतर्गत काही गावात काही नागरिक संशयास्पद रित्या फिरत आहेत.या लोकांना मराठी अथवा हिंदी भाषा देखील फारशी समजत नाही.विशेष हे सर्वजण या भागातील रहिवाशी नसताना देखील यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रहिवाशांच्या यादीत गावातील कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या मतदारांची नावे समाविष्ट
आहेत.अशा व्यक्ती येथील रहिवासी नाहीत.
याबाबत चौकशी करून कारवाई करत यादीतून नावे वगळण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.हा प्रकार पाथर्डी तालुक्यातील अकोले या ठिकाणी घडला आहे.याबाबत सरपंच तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदन देत प्रकरणाची माहिती दिली.

या वेळी शिष्टमंडळाने संशयित ५४ व्यक्तींचे आधार कार्ड, मतदान यादीतील क्रमांक याची यादी तहसीलदारांना सादर केली. या वेळी बोलताना सरपंच धायतडक म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या लोकांच्या हालचाली संशयास्पद असून, सर्वजण कार्डावरील नोंदीनुसार मुस्लिम समाजाचे आहेत.
प्रत्येकाबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली तर त्यातील पुरुषवर्ग भाषा समजत नाही,असे भासवून काहीच बोलत नाही, तर महिला कोणत्याही गावाचे नाव सांगतात. लहान मुले गावभर दारोदार फिरतात.या लोकांचा व गावचा कधीही संबंध आला नाही.
तरीही यंत्रणेतील कोणाला तरी हाताशी धरून त्यांनी मतदान कार्ड, आधार कार्ड मिळवले आहे. तालुक्यातील प्रमुख काही गावांमध्येसुद्धा असे लोक गेल्या काही दिवसांपासून वावरताना आढळतात.याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख स्थानिक पोलिसांकडेसुद्धा ग्रामस्थांनी संपर्क साधला आहे.
या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी बोलताना तहसीलदार डॉ. नाईक म्हणाले,ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची त्वरित चौकशी करून तपासणी दरम्यान दोषी आढळल्यास त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.