जायकवाडीसाठी मुळा, भंडारदरा मधून किती टीएमसी पाणी जाणार? मुळातून शेतीसाठी आता किती आवर्तने कमी सोडली जाणार? पहा सर्व माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास अखेर सुरवात झाली. नाशिक मधील दारणा व नगरमधील निळवंडे मधून सध्या पाणी सोडले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण समुहातून ५.४६ टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडले जाणार आहे.

यामध्ये मुळा धरण समुहातून २.१० टीएमसी, भंडारदरा-निळवंडे समुहातून ३.३६ पाणी सोडले जाईल. भंडारदरा समुहातून शनिवारी (२५ नोव्हेंबर) १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. रविवारी हा विसर्ग १० हजार क्युसेकपर्यंत नेण्यात येणार आहे.

तर मुळा मधून रविवारी मध्यरात्रीनंतर पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान मुळा धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीपात्रातील ४ बंधाऱ्यांचे दरवाजे खुले करण्याचे काम शनिवारी युद्धपातळीवर सुरू आहे. इकडून तिकडे पाणी जाण्यासाठी साधारण तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो.

* इतर धरणांपेक्षा मुळातून पाणी उशिरा का सोडतात? यामागे काय आहे लॉजिक?

यामागे अंतराचे कॅल्क्युलेशन आहे. नाशिक, भंडारदऱ्यातील जायकवाडीपर्यंतचे अंतर जास्त आहे, तर मुळा धरणाचे अंतर अवघे ६० किमी आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व पाणी जायकवाडीत पोहोचावे यासाठी मुळा धरणातून दोन दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जाते.

गंगापूर धरण ते जायकवाडी धरणापर्यंचे अंतर १९० किमी, दारणा धरण ते जायकवाडी धरणापर्यंचे अंतर १७० किमी आहे. अहमदनगरमधील मुळा धरण ते जायकवाडी धरणापर्यंचे अंतर ६० किमी तर भंडारदरा धरण ते जायकवाडी धरणापर्यंचे अंतर १९० किमी आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व पाणी जायकवाडीत पोहोचावे यासाठी मुळा धरणातून दोन दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जाते.

* शेतीसाठी सिंचनासाठी मुळातून एक आवर्तन कमी

मुळा धरणातून सिंचनासाठी खरीप, रब्बी, तसेच उन्हाळी आवर्तन सोडले जाते. परंतु, धरणातून २.१० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा एक उन्हाळी आवर्तनाची कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मुळातून एक आवर्तन कमी असणार आहे.

* पाणी सोडल्यानंतर आ. काळे आक्रमक

जायकवाडीला पाणी सोडले आहे. परंतु त्यानंतर आ. आशुतोष काळे आक्रमक झाले आहेत. मराठवाड्याला पाणी सोडणे हा कोर्टाचा अवमान असून या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी दोषी असतील, त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करू असा इशाराच त्यांनी दिला आहे. अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही काळे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe