अहमदनगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. अनेक संघटना हे नाव बदलावे अशी मागणी करत आहे.
अहमदनगर हे नाव बदलून काय नाव असावे यासाठी अनेक नवे समोर आली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमध्ये येत एका सभेत अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करू असे सांगितले.

तेव्हापासून अहमदनगर ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ होणार अशा चर्चा होऊ लागल्या. अनेकांनी याबाबत समाधानही व्यक्त केले. परंतु आजतागायत हे नामकरण झालेच नाही.
आता याबाबत सुरु असलेल्या अधिवेशनात आ. राम शिंदे यांनी मुद्दा मांडला व यावर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनाने गांभीयनि दखल घ्यावी अशी सूचना केली.
अधिवेशनात काय घडलं?
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा आ. राम शिंदे यांनी मांडला. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करण्याचा निर्णय झाला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे २०२३ ला चोंडी येथे जाहीर केले होते
परंतु अद्याप या बाबत कार्यवाही झाली नसल्याने लोकांत नाराजी आहे असे आ. शिंदे म्हणले. तसेच या बाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही यावेळी केली. यावर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनाने गांभीयनि दखल घ्यावी अशी सूचना केली.
विविध संघटनांसह नेतेमंडळीही आग्रही
मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदण्यात यावे यासाठी विविध हिंदूत्ववादी संघटना आग्रही आहेत. आ. राम शिंदे यांनीही या मागणीस पाठिंबा देत अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करण्यात यावे असे म्हटले होते.
यासोबतच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नीतेश राणे यांनीही नामांतराची मागणी केली होती. विशेष म्हणजे ३१ मे २०२३ रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती
त्यांनी स्वतः अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ असे नामकरण केल्याचे जाहीर केले होते. परंतु आता या गोष्टीला अनेक दिवस उलटले परंतु कार्यवाही मात्र झाली नाही. त्यामुळे हे नामकरण कधी होणार याबाबत सध्या नागरिकांतून विचारणा होत आहे.