Ahmednagar News : हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल इन्स्टाग्रामवर अवमानकारक व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल तालुक्यातील बेलापूर येथील एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकाराबद्दल बेलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचबरोबर औरंगजेबचे समर्थन करणारा एक व्हिडीओही पाठवून भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. याबाबत कृष्णा राजेंद्र ढेपे (रा. पढेगाव) हा विद्यार्थी श्रीरामपूरला एफवायबीए या वर्गात शिक्षण घेतो.
त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर (दि. १६) ऑगस्ट रोजी रात्री एका इन्स्टाग्राम अकौंटवरून हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल वाईट शब्द वापरून अवमानकारक व्हिडीओ पाठवण्यात आला. हा व्हिडीओ सदर विद्यार्थ्याने आल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना तो दाखवला.
त्यानंतर सदर व्हिडीओ हा बेलापूरात राहणाऱ्या आदील रसूल शेख याच्या आयडी नंबरवरून आल्याचे समजले. त्याचबरोबर (दि. १३) ऑगस्ट रोजी रात्री ९.१५ वाजेच्या दरम्यान कृष्णा ढेपे याचा मित्र समाधान पुरी (रा. लाडगाव ) याच्या मोबाईल क्रमांकावर आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवला. सदर व्हिडीओ हा या विद्यार्थ्याने त्याचे मित्र किशन ताकटे (रा. श्रीरामपूर), योगेश पवार (रा. बेलापूर), करण मापारी (रा. अशोकनगर), केशव शिंदे (रा. बेलापूर) यांनाही दाखवला.
त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या फिर्यादीवरून प्रभू श्रीरामांबद्दल अवमानकारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे कृत्य करून दोन वर्गामध्ये द्वेषाची भावना निर्माण केली म्हणून आदील रसूल शेख (रा. बेलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.
हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल बेलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.