Ahmednagar News : नगर शहरातील शेकडो घरे पाडली जाणार? साडेबारा एकर जागेचा ताबा मूळ मालकास देण्याच्या कार्यवाहीस सुरवात ! मोजणी करून ठोकल्या खुंट्या

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरातील साडे बारा एकर जमिनीचा ताबा मूळ मालकांना देण्याची कार्यवाही काल (१८ जानेवारी) पासून सुरू झाली आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नगर-पुणे महामार्गावरील

शिल्पा गार्डन वास्तूची मोजणी सुरू केली व हद्दीच्या खुणा स्पष्ट दाखवणाऱ्या लाकडी खुट्या जमिनीत ठोकणे सुरू केले. परिसरातील इतर शोरूम आदी वास्तूंचीही मोजणी झाली. आता या भागातील सुमारे २५० ते ३०० कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला असून

ही कार्यवाही सुरु असताना शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अनुचित घटना टाळण्यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बुरूडगाव रस्ता ते पुणे रस्ता दरम्यानच्या पट्ट्यातील भोसले आखाडा, विनायकनगर, चंदन इस्टेट, माणिकनगर, शिल्पा गार्डन या परिसरातील १२.५ एकर जागेचा ताबा उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिघे वादी व पाच प्रतिवादी अशा एकूण आठ जणांना देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली गेली आहे. हा ताबा देण्याआधी या परिसरात ठिकठिकाणी जाहीर प्रकटन देखील लावण्यात आलेले होते.

प्रांताधिकारी पाटील तहसीलदार संजय शिंदे, विभागाच्या अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील दोन ते अडीच एकर करून मार्किंग खुणा प्रक्रियेत अडथळा ठरणाऱ्या पत्र्याच्या शेड व अन्य किरकोळ बांधकामे जेसीबीने काढण्यात आली.

कोणीही या कार्यवाहीला विरोध केला नाही. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सकाळी साडेदहापासून सुरू करण्यात आली ती सायंकाळपर्यंत सुरू होती. शिल्पा गार्डननंतर माणिकनगर, चंदन इस्टेट,

भोसले आखाडा परिसरातही अशी मोजणी केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले. यामुळे या भागातील २५० ते ३०० कुटुंबाचा प्रश्न निर्माण होणार असून हे प्रकरण नेमके कसे थांबणार? पुढे काय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!