पिस्तूल डोक्याला लावत पती पत्नीस मारहाण; शहरातील घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- अहमदनगर उपनागरामधील पाईपलाईन रोड ला जागेच्या वादावरून थेट पिस्तुल डोक्याला लावून पती पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कुलदीप भिंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भिंगारदेवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदा नगर मध्ये जात असताना जीशान शेख या युवकाने कुलदीप भिंगारदिवे यांना आडवून जागेच्या वादात तू पडू नकोस असा दम दिला.

त्यानंतर जीशान शेख याच्या बरोबर असलेल्या अनोळखी इसमांनी कुलदीप भिंगरदिवे यांना मारहाण करत शिवीगाळ सुरू केली.

हा प्रकार पाहून कुलदीप भिंगारदिवे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली असता कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीसही मारहाण करण्यात आली.

तन्मीन शेख याने कुलदीप भिंगारदिवे यांच्या डोक्याला बंदूक लावली. ही घटना पाहून कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीने त्या ठिकाणी माफी मागत भांडण मिटवून घेण्याची विनंती केली आणि तेथून निघुन गेले.

या प्रकरणी कुलदीप भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून जिशान शेख,अशोक शेकडे,तन्मीन शेख आणि अन्य चार अनोळखी लोकांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe