अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसापासून राजकारणाची पातळी खालावत चालली असून, राजकारण भरकटत चालले आहे. थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही. (Monika Rajale)
अशी खंत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील एका। विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मात्र याकडे राज्य सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर देखील नको त्या कामासाठी अधिक केला जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे निधी मिळत नाही, त्यामुळे वीज, रस्ते यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत. अन त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे. मात्र सरकारला याबाबत काहीच देणे घेणे नाही अशी देखील त्यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम