अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- पालकमंत्री मुश्रीफ हे शुक्रवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याच्या मनस्थितीत असून तशी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली आहे’ याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना प्रश्न विचारला.
अजून मला पालकमंत्रिपदावरून काढले नाही. अजूनही पालकमंत्री मीच आहे. भाजपकडून आपल्याला लक्ष्य केले जात असले तरी त्यात काही फारसे तथ्य नाही. किरीट सोमय्या यांच्या विरोधात दोन दावे केल्याचे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ दोन दिवसांच्या नगरच्या दौऱ्यावर आले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी करोना संबंधीच्या उपाययोजना, संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी, अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणारी मदत यासंबंधी माहिती दिली.
नगरचे पालकमंत्री पद सोडण्यासंबंधी ते म्हणाले, ‘दोन्ही जिल्ह्यांत एका मंत्र्याला काम करणे शक्य नाही, त्यामुळे आपण यासंबंधी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली आहे.
त्यावर वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे. मात्र, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत सोपविण्यात आलेली ही जबाबदारी आपण निष्ठेने निभावणार आहे. केवळ मीच नाही, तर आणखी काही मंत्र्यांचा हाच प्रश्न आहे.
निवडणुकांच्या काळात एकेका जिल्ह्याची जबाबदारी असल्यास सोयीचे पडणार आहे.’ महापालिकांच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यावरही मुश्रीफ बोलले.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये शक्य तेथे महाविकास आघाडी होईल. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. जे मंत्री भाजप आणि केंद्र सरकार विरोधात बोलत आहेत,
त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात आहेत. आपल्यावरही याच कारणातून आरोप होत आहेत. आता मात्र सगळे मिळून भाजपचा हा डाव हाणून पाडणार आहोत, असे मुश्रीफ म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम