काय सांगता : ‘या’ बाजार समितीच्या मतदार यादीत अनेक नावे बोगस

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :-  सध्या बाजार समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीवर आपलेे वर्चस्व स्थापन करण्यासाठी अनेक पुढारी प्रयतनशील आहेत.

मात्र कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादीत ३० ते ४० टक्के बोगस मतदार हमाल -मापाडी व व्यापारी मतदार यादीमध्ये घुसविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप हमाल -मापाडी संघटने निवेदनाद्वारे केला आहे.

लवकरच येथील बाजार समितीची निवडणूक होणार असून, यासाठी नुकतीच प्रारुप मतदारयादी जाहीर करण्यात आली. मात्र या प्रारूप मतदार यादीत हमाल -मापाडी तसेच व्यापारी मतदार यादीत ३० ते ४० टक्के बोगस नावे घुसविण्यात आली आहेत.

सदर बोगस लोक कोणत्याही अडतीवर अथवा कर्जत तालुक्यातील कोणत्याही दुकानावर हमालीचे काम करत नाहीत, तरीही अशा लोकांची नावे मतदारयादीत कशी आली व कोणी आणली.

याउलट गेली दहा वर्षे कर्जत तालुक्यात आडतीवर हमाली काम करणाऱ्यांना मात्र मुद्दाम या यादीतून वगळले असून, त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे या बोगस नावे घुसविण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.अशी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe