पोलीस असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकांना असे काही केल्यास….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर जिल्ह्यात एम एच-01 या स्कार्पिओ वाहनातून मुंबई पोलीस असल्याचे भासवून पैशाची मागणी,दारू बॉक्स हॉटेल मधून घेऊन जात असल्याचे समजले आहे.

याबाबत काही बाबी निदर्शनास आल्यास राहुरी पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी केले आहे.

राहुरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाठविलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले की, MH- 01 पांढऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमधून 4 ते 5 इसम मुंबई पोलीस असल्याची बतावणी करून

हॉटेल चेक करीत आहेत व हॉटेल व चालकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करीत आहेत तसेच अधिकृत परमिट रूम मधील दारूचे बॉक्स व पैसे घेऊन जात आहेत.

हॉटेल मध्ये जाण्या अगोदर गाडीवर पोलीस स्टिकर व लाल दिवा लावतात, आपल्या हद्दीमधील सर्व हॉटेल चालकांना याबाबत सूचना देऊन मिळून आल्यास संपर्क करणेस, कळवणेस विनंती आहे.

दरम्यान अधिक माहिती साठी संपर्क:- 82081 36199 किंवा 02426-232433 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दराडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe