पाचशे एकरमध्ये एमआयडीसी उभी राहली, तर रोजगार उपलब्ध होईल – आमदार शिवाजीराव कर्डिले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आमचे सरकार आल्यापासून नगर तालुक्याबरोबर दक्षिण भागात वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची कामे केली.

मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम केले. पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना अश्या विविध योजनांच्या माध्यमातून खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे झाली.

वडगाव गुप्ताच्या हद्दीत महाराष्ट्र सरकारच्या असलेल्या पाचशे एकर जागेत विखेंनी स्वतः पुढाकार घेऊन ती जागा एमआयडीसी उभी व्हावी, याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.

पाचशे एकरमध्ये एमआयडीसी उभी राहली, तर रोजगार उपलब्ध होईल व बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाह बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

वडगाव गुप्ता येथील १.३४ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार कर्डिले व धनश्री सुजय विखे यांच्या हस्ते दत्तमंदिर परिसर फोर्जिंग कॉलनी व भैरवनाथ मंदिर, माळवाडी व स्मशानभूमी येथे झाला.

यावेळी नगर बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ, वडगावगुप्ताच्या सरपंच सोनुताई विजय शेवाळे, उपसरपंच व सर्व ग्रा.प. सदस्य सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

धनश्री विखे म्हणाल्या, विखे पाटील उपस्थित होते. परिवार हा नेहमी आपल्या पाठीशी आहे. जास्तीत जास्त निधी आणून शहराबरोबरच खेड्यांचा विकास करत आहोत. यापुढे करणार आहे.

उपसरपंच विजय शेवाळे म्हणाले, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शहराबरोबरच खेड्याचा विकास केला. खासदार सुजय विखे यांनी कामाच्या जोरावर खेडगावाचा विकास केला. वडगावगुप्ता ग्रामपंचायतला भरीव निधी दिला.

मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सहकायनि आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. याचा आगामी काळात गावाला फायदा होणार आहे, असेही उपसरपंच विजय शेवाळे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe