अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर निर्णय शासनाला घ्यावे लागले होते. त्यातच मंदिर बंद ठेवणे हा देखील एक निर्णय होता. यात साई मंदिराचाही समावेश होता.
17 मार्च 2020 पासून श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मागणी होत आहे.
मनसेने साई मंदिर न उघडल्यास खळ्ळ खट्याक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका व शिर्डी शहराच्यावतीने साईभक्तांसाठी साईबाबांचे मंदिर खुले करण्यासाठी
आंदोलन करू असा इशारा दिला होता. याबाबत पोलीस व साईबाबा संस्थान प्रशासनाने मनसे पदाधिकार्यांशी चर्चा करत प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत असून
यातून लवकरच मार्ग निघेल असे आश्वासन दिल्यानंतर मनसेच्यावतीने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी साईमंदिर लवकरात लवकर खुले न केल्यास 25 सप्टेंबर रोजी मनसे खळ्ळ खट्याक आंदोलन छेडेल,
असा इशारा पत्रकात दिला. पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी शहर संघटक लक्ष्मण कोतकर तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव या सर्वांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
तोपर्यंत आंदोलन साईबाबा संस्थांनच्या अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी सांगितलेल्या श्रद्धा व सबुरी तसेच प्रशासकीय कार्यकारी अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन यापुढे मंदिर जर साईबाबा संस्थांननी व प्रशासनाने जर उघडले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 25 सप्टेंबर रोजी कुठल्याहीक्षणी आंदोलन छेडेल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved