अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केल्याच्या मुद्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणााले, कर्डिले आडवाटेने आले असते तर माझी भेट झाली असती, असा टोला त्यांनी लगावताच आमच्याकडे शीट आहे.
त्यांच्याकडे बॅलेन्स आहे, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांना लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
माझ्यावर टीका करणारे खासदार डॉ. सुजय विखे हे मोठे नेते आहेत. आमच्याकडे शीट आहे. त्यांच्याकडे खरा बॅलन्स आहे. भाजपमध्ये गेल्याने त्यांना शांत झोप लागते असा त्यालाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.
पालकमंत्री शोधून सापडत नाहीत, असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केल्याच्या मुद्द्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पहिले आठ वाटेने आले असते तर माझी भेट झाली असती असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे व मंत्री नवाब मलिक यांच्या व्हायरल झालेल्या क्लिप बाबत मुश्रीफ यांना विचारले असता मलिक यांची क्लिप तपासा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम