Ahmednagar News : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हंगाम सुरू केला आहे. एफ.आर.पी.पेक्षा २८ रुपये जादा दर देत २५०० रुपये टन भाव देऊन एफ. आर.पी.च्या २०० रुपयांप्रमाणे पैसे अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.
शेजारच्या कारखान्यांपेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी शेतकऱ्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. कारण अगस्ती कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही, अशी भावना कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ काल बुधवारी गायकर यांच्या हस्ते गव्हानीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक रामनाथ वाकचौरे व त्यांच्या पत्नी यांनी विधिवत पूजन केले.
गायकर म्हणाले, चार महिन्यांपासून अथक परीश्रम करुन हंगाम सुरू केला आहे. जिल्हा बॅकेचे अल्पमुदत कर्ज थकल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सातारा येथील उद्योजक नितिन शिंदे यांनी १८ कोटी रूपयांची इथोनॉलपोटी मदत केली.
माझ्यासह सर्व संचालकांनी आपल्या नावावर कर्ज काढुन जमिनी गहाण ठेवून १३ कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध केले. तालुक्यातील पतसंस्थांनी मदत केली. शेतकरी व कामगारांनीही मदत केली, असे ते म्हणाले.
यावेळी कारभारी उगले, पांडुरंग नवले, मिनानाथ पांडे, प्रकाश मालुंजकर, भाउपाटील नवले, महेश नवले, चंद्रकांत नेहे, उपाध्यक्ष सुनिताताई भांगरे, अॅड. वसंत मनकर, विजय वाकचौरे, सुरेश नवले यानी मनोगत व्यक्त केले.