जर तुम्ही मद्यपान करून गाडी चालवत असाल तर काळजी घ्या अन्यथा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणार्‍याविरोधात कारवाईकरण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी जिल्हा पोलिसांना दिले आहेत.

जिल्हा पोलिसांनी रविवारी रात्री जिल्ह्याभरात विशेष मोहिम राबवून मद्यप्राशान करून वाहन चालविणार्‍या ४७ वाहन चालकाविरोधात कारवाई केली आहे.

त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत कळविले असल्याचे, नगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविल्यामुळे रस्ते अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी रविवारी रात्री आठ ते १२ यावेळेत जिल्हाभर वाहन चालकांची तपासी करून

मादक द्रव्याचे सेवन करणार्‍या ४७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढे सुरू राहणार असून वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहने चालवू नये, असे आव्हान जिल्हा पोलिसांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe