पुन्हा पैसे मागितले तर तुझे कुऱ्हाडीने तुकडे करुन टाकतो..! अशी धमकी दिली अन…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar news : जेसीबीच्या उचलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका विवाहीत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून पुन्हा पैसे मागितले तर तुझे कुऱ्हाडीने तुकडे करुन टाकतो.

अशी धमकी देत त्या विवाहीत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून तीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना राहुरी तालुक्यातील एका गावात दि. २४ जून २०२४ रोजी घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेतील विवाहीत तरुणी राहुरी तालुक्यातील एका गावात तीच्या कुटुं‌बासह राहाते. तीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. २४रोजीरात्री ८.१५ वाजेच्या सुमारास ती घरासमोर असताना तेथे अनिल रामकिसन धनवडे व अशोक जगन्नाथ मोरे हे दोघेजण आले.

त्यांनी जेसीबीच्या उचलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन पीडित तरुणीच्या पतीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि तु पुन्हा पैसे मागितले तर तुला मारुन टाकू, अशी धमकी दिली, तसेच तरुणीला शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.

नंतर विनयभंग केला. यावेळी तरुणीची सासू भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि कुऱ्हाड उचलुन तुझे कुऱ्हाडीने तुकडे करुन टाकतो, असे म्हणून दरवाजावर, ट्रॅक्टरचे हेडलाईट, बोनेटवर कुऱ्हाडीने मारुन नुकसान केले.

तरुणीच्या फिर्यादीवरून अनिल रामकिसन धनवडे व अशोक जगन्नाथ मोरे (दोघेही रा. वांबोरी, ता. राहुरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe